मागील आठवड्याभरापासून राज्यात जो सत्तासंघर्ष सुरु आहे ते आपण पाहतोच आहोत. दररोज नवनवीन घडामोडी घडताहेत. अशातच मराठी सिनेसृष्टीतील दोन कलाकार आता एकमेकांसमोर उभे ठाकलेत की काय असं चित्र आहे. कारण होम मिनिस्टरनिमित्त भावोजी म्हणून घराघरात पोहचलेल्या आदेश बांदेकरांनी शरद पोक्षेंना उद्देशून इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन हा शरद पोंक्षे तूच ना? असा सवाल विचारला. आता हे सगळं प्रकरण काय आहे, ते जाणून घेऊयात.